About Clinic बऱ्या झालेल्या केसेस About Clinic

प्लांटर वॉर्ट्स / कुरूप चामखीळ

पायावरील कुरूप / चामखीळ सौम्य ऍपिथेलियल ट्यूमर ह्या प्रकारातील असतात. सामान्यतः मानवी पॅपिलोमाव्हायरस प्रकारच्या संक्रमणामुळे होतात.

हे व्हायरस त्वचेवरील भेगा / चिरा अशा भागातून प्रवेश करतात, संभाव्यतः या विषाणूंचे संक्रमण लहान भेगा / चिरांमधून प्रवेश करतात परंतु काही आठवडे किंवा महिने ते दिसत नाहीत. पाय किंवा बोटांच्या एका बाजूला दाब झाल्यामुळे वातनलिका आत सरकली जाते आणि कठोर त्वचेचा थर बनतो. वेळीच उपचार न केल्यास कुरूप / चामखीळ अधिक वेदनादायक होऊ शकतात.*

*https://en.wikipedia.org/wiki/Plantar_wart

गँगरीन

योग्य प्रमाणात रक्त पुरवठा न झाल्याने त्या भागातील पेशी मृत पावतात त्यामध्ये त्वचेच्या रंगात बदल (लाल किंवा काळा) होणे, सुन्न, सूज, वेदना, त्वचेस इजा आणि थंडपणा जाणवणे अशा लक्षणांचा समावेश असू शकतो यालाच गँगरीन असे म्हणतात.

यासाठीच्या उपचार पद्धती मध्ये त्वचेतील संक्रमण थांबवण्याकरिता अँटीबायोटिक्स सारख्या औषध किंवा शस्त्रक्रियेची मदत घेतली जाते. सर्जिकल प्रयत्नांमध्ये मृतपेशी विच्छेदन किंवा मॅगॉट थेरपीचा वापर समाविष्ट असू शकतो.

*https://en.wikipedia.org/wiki/Gangrene

चामखीळ

चामखीळ - शरीरावर कुठेही दिसू शकणारी हानीकारक त्वचा वाढ. ते एक लहान फोड किंवा फुलकोबीसारखे दिसू शकते. याचे कारण म्हणजे विषाणू (एचपीव्ही) जे केराटीनच्या अति व जलद वाढीस कारणीभूत ठरते.

सोरायसिस

सोरायसिस हा एक तीव्र / जुनाट त्वचा रोग आहे ज्यामध्ये त्वचेवरील पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर वेगाने वाढतात ज्यामुळे त्वचा संवेदना क्षम होते आणि म्हणूनच त्वचेवर भेगा पडणे, असह्य खाज येणे भेगांमधून पाणी किंवा रक्त येणे आणि त्याभागाला असह्य वेदनादायक होऊ शकतात.

हा आजार अतिशय संवेदनशील रॊप्रतिकारक शक्तीच्या प्रणालीमुळे होतो. तसेच हा आजार अनुवांशिक मनाला जातो, तसेच या आजाराच्या संक्रमणासाठी मानसिक तणाव प्रामुख्याने कारणीभूत ठरतो.

एक्झिमा / इसब

एक्झिमा - हा त्वचा रोग असून आजारांचा एक समूह आहे ज्यामध्ये त्वचा लालसर होणे असह्य खाज येणे सूज येणे, फोड येणे अशी एकूणच बरीच लक्षणे दिसतात या आजाराचे अचूक कारण स्पष्ट नसून चिडचिड, ऍलर्जी आणि अपुऱ्या रक्तपुरवठ्या मुळे होऊ शकते.

याला कारणीभूत घटक म्हणजे शुष्क त्वचा, धातू, रसायने, फॅब्रिक, औषधे इत्यादीगोष्टींची ऍलर्जी आणि तणाव ...