About Clinic आमची टीम About Clinic

डॉ. प्रफुल्ल बोरकर

डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचे विद्यार्थी, सध्याच्या काळातील एक प्रसिद्ध होमियोपॅथ... गेल्या २४ वर्षांपासून रुग्णांची आपल्या उपचारातून सेवा करीत आहेत.

असे चिकित्सक जे जुन्या धाटणीचे असून; मानतात कि केवळ चांगले कार्य आणि रुग्णांकडून होणारी प्रशंसा हा डॉक्टर म्हणून लोकप्रिय आणि यशस्वी होण्याचा मार्ग आहे. ते त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला त्यांच्या कडील सर्वोत्तम उपचार देण्यावर विश्वास ठेवतात.

डॉ. बोरकर अविरत, प्रामाणिकपणे आणि सचोटीने गेली २४ वर्षे त्यांच्या रुग्णांवर सर्वोत्तम क्षमतेने उपचार करत आहेत आणि असेच शेवटपर्यंत सुरु ठेवण्याच्या प्रयत्नांत ते राहतील...

त्यांना प्रामाणिक पणे असे वाटते कि होमियोपॅथी ही औषधोपचाराची सर्वोत्तम प्रणाली असून इतर कोणत्याही औषधोपचारपेक्षा सोपी, सहज आणि आरोग्यदायी आहे.

सांघिकरित्या एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर विश्वास ठेवतात, तसेच ते मानतात की, रुग्णांचे आरोग्य हे इतके महत्वाचे आहे, जे एकट्या - दुकट्याने हाताळण्याचे काम नाही आणि म्हणूनच, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या संघाची निर्मिती केली आहे.

कुशविहार क्लिनिक येथील कंसल्टंट डॉक्टर

डॉ. शेफाली प्रफुल्ल बोरकर

डॉ. प्रफुल्ल बोरकर यांच्या पत्नी, ज्या स्वतः हुशार आणि ज्ञानी डॉक्टर असून रुग्णांना उत्तम हाताळण्याच कौशल्य त्यांच्या कडे आहे. तसेच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या कामात त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करतात.

१५ वर्षांपासून डॉ. बोरकर क्लिनिकच्या दादर (पूर्व) या दवाखान्यामध्ये यशस्विरित्या प्रॅक्टिस करत आहेत. आता त्यांनी शिवाजीपार्क दादर (पश्चिम) जवळील दवाखान्यात स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरु केली आहे. या दवाखान्यात नियमित येणाऱ्या रुग्णां व्यतिरिक्त त्यांचे इतर काही रुग्ण आहेत. जे रुग्ण पश्चिमेकडून पूर्वेला येऊ शकत नाहीत तसेच ज्यांना येणे त्रासदायक होते त्यांच्या सोईकरिता तिथे ही वेळ देतात.

त्या नियमित सकाळी ११ ते १ दरम्यान डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये (मंगळवार गुरुवार सोडून) तसेच मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी ६ ते ८ मध्ये शिवाजी पार्क दादर (पश्चिम) दवाखान्यात रुग्ण पाहतात.

डॉ. आरती अजमेरा

एक मुळातच प्रामाणिक मेहनती व्यक्ती जी डॉ बोरकर क्लिनिक मध्ये ६ वर्षाहून अधिक विझिटिंग कंसल्टंट म्हणून कार्यरत आहेत त्या दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २.३० वा. पर्यंत पेशंट पाहतात.

त्या एक चांगल्या चिकित्सक असून पेशंट त्याच्या सोबत बरेच मोकळे पणाने बोलतात त्याचा २० वर्षाचा दांडगा अनुभवामुळे क्लिनिक व्यवस्थापनात तसेच पेशंट संधर्भात कनिष्ठ डॉक्टर ना त्यांची मदतच होते.

डॉ. सुचेता ठाकूर

डॉ. सुचेता ठाकूर इंटरनशीप संपल्यासंपल्या लगेचच डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये असिस्टंट म्हणून रुजू झाल्या, आज डॉ. बोरकर क्लिनिक मधील त्यांचा अनुभव १२ वर्षांचा असून त्या सर्वात सिनिअर कंसल्टंट म्हणून क्लिनिक मधील कार्यभार सांभाळतात ,त्यात डॉ अनिला खेडेकर ही सोबत असतात.

शिक्षणातील त्यांच्या चिकाटीमुळे डॉ. बोरकर क्लिनिक मधील सर्वात विश्वासाहार्य सल्लागारांपैकी एक आहेत. त्या रुग्णांना चांगल्यारितीने हाताळत असल्यामुळेच, रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांच्याशी रुग्ण सहजपणे संवाद साधतात. त्या जीवनशैली व्यवस्थापन बद्दलचे मार्गदर्शन देखील छान करतात. तसेच त्या इमेल ला देखील उत्तरे देतात.

डॉ. बोरकर क्लिनिक मधील त्यांचा इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

डॉ. अनिला खेडेकर

डॉ. अनिला ७ वर्षांपासून डॉ. बोरकर क्लिनिकशी जोडल्या असून असिस्टंट म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि नंतर कन्स्लटंट झाल्या, आता त्या सिनिअर कंसल्टंट म्हणून डॉ. सुचेता ठाकूर यांच्या सोबत दैनंदिन कार्यभार सांभाळतात.

डॉ. अनिलांच्या मेहनती आणि विनम्र स्वभावामुळे पेशंट वरील उपचाराच्या व्यवस्थापनात मोठा सकारात्मक सहभाग होतो. आणि त्याजोगे रुग्ण त्यांना भेटण्यासाठी थांबतात.

डॉ. अनिला, डॉ. बोरकर यांच्या धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) दवाखान्यात प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहतात त्यामुळे त्यांचा भार दुप्पट वाढलेला आहे. धर्मदाय दवाखान्यात न परवडणाऱ्या रुग्णांना देखील त्याच सामान निष्ठेने पाहतात. डॉ सुचेतान सोबतच इमेल ना उत्तर देणे हि जबाबदारी देखील त्या पार पडतात.

डॉ. आफ्रिन जागीरदार

एक परिपूर्ण निरीक्षक, बुद्धिमान, मेहनती व कठोर परिश्रम असे शब्द या वयाने तरुण असलेल्या आमच्या कंसल्टंट डॉ. आफ्रिन यांच्यासाठी योग्य आहेत.

त्यांना दिल्यागेलेल्या केसेस मध्ये त्या सर्वोत्तम इलाज शोधण्यासाठी वैद्यकीय आणि होमिओपॅथिक अशा दोन्ही पद्धतीने आजाराच्या गाभ्यात शिरून उत्तम औषध काढतात.

त्या रुग्णांची अत्यंत काळजी घेतात आणि म्हणूनच त्या डॉ. बोरकर क्लिनिकला एक मौल्यवान जोड म्हणून लाभल्या आहेत .

डॉ. संजय कुमार यादव

अलाहाबाद उत्तरप्रदेश येथून डॉ. बोरकरांकडे शिकण्यासाठी आलेले डॉ. संजयना मेडिसिन आणि होमिओपॅथीचे चांगले ज्ञान असून ते वेगळ्या राज्यातून येऊन सुद्धा शिक्षणासाठीआणि एक बुद्धिमान डॉक्टर म्हणून प्रगल्भ होण्यासाठी येथे थांबले.

त्यांची शिकण्याची इच्छा, कठोर परिश्रम, उत्सुक अवलोकन, होमियोपॅथी बद्दलचे प्रेम आणि रुग्णांवर त्यांच्या कडून केले गेलेले उपचार ह्यामुळे ते दवाखान्यातील मांडणीचा (सेटअप) एक अविभाज्य घटक बनले आहेत.

बांद्रा क्लिनिक येथील कंसल्टंट डॉक्टर

डॉ. वर्षा नैनानी

डॉ. बोरकर क्लिनिकशी ७ वर्षांहून अधिक काळ जोडलेल्या डॉ. वर्षा आता बांद्रा क्लिनिक चे रुग्ण डॉ. प्रफुल्ल बोरकरांच्या गैरहजेरीत सुद्धा एकट्या सहज सांभाळतात. डॉ. प्रफुल्ल बोरकर १५ दिवसातून एकदा त्या दवाख्यान्यात जातात.

त्या रुग्णांचे व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समस्येचे प्रभावीपणे निराकरण करतात. भविष्यात अधिकाधिक चांगले काम करण्याचे त्या आश्वासन देतात.

रुग्णांना हवी असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे, रुग्ण स्वतःला त्यांच्या हाती सोपवून सुरक्षित आणि निश्चिंत असतात.

शांतिकुंज सेमी-चॅरिटेबल क्लिनिक येथील कंसल्टंट डॉक्टर

डॉ. निखिल कांबळी

१४ वर्षांहुन अधिक जास्त स्वतःच्या खाजगी प्रॅक्टिसचा अनुभव असलेले डॉ. निखिल कांबळी, डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये २००५ ते २००८ मध्ये असिस्टंट आणि नंतर २०१२ साली विझिटिंग कंसल्टंट झाले.

डॉ. बोरकरांच्या धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) क्लिनिक मध्ये २०१७ पासून दर बुधवार आणि गुरुवार सकाळी १०.३० ते १.३० रुग्णांना बघतात.

औषधाबद्दलचे ज्ञान आणि अनुभव त्यांना डॉ. बोरकर क्लिनिक मधील महत्वपूर्ण जोड बनवते. या जेष्ठ आणि हुशार डॉक्टर वर रुग्णांचा विश्वास आहे.

डॉ. निखिल, शिकाऊ आणि नुकतेच तयार झालेल्या सहाय्यक डॉक्टर्सना सुद्धा जिथे-जिथे जमेल तिथे स्वतः मार्गदर्शन करतात. थोडक्यात, एक अतिशय संसाधनात्मक समंजस व्यक्ती.

डॉ. गुलाब जैस्वार

अलोपॅथी सोडून होमियोपॅथी प्रॅक्टिस सुरु करणारे डॉ. गुलाब होमियोपॅथी कडे वळण्याचे कारण म्हणजे या उपचार पद्धती द्वारे रुग्णांना मिळणारा दिलासा आणि दिवसेंदिवस होमियोपॅथीची होणारी प्रगती...

सुरुवातीला असिस्टंट म्हणून रुजू झालेले डॉ. गुलाब, डॉ. बोरकर क्लिनिक मध्येच शिकून तयार झाले आहेत आणि आता धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) दवाखान्यामध्ये विझिटिंग कंसल्टंट म्हणून मंगळवार आणि शुक्रवार दुपारी ३ ते ६ दरम्यान बसतात.

त्याचा शांत आणि सौम्य स्वभाव त्याच्या डॉक्टरी पेशाला शोभणारा आहे.

डॉ. मिनीता परमार

डॉ. मिनीता असिस्टंट म्हणून २०१३ ते २०१५ मध्ये कार्यरत होत्या त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा डॉ बोरकर क्लिनिकला येणे सुरु केले.

त्यांची चांगलं काम करण्याची उत्कंठा पाहून पुन्हा २०१८ साली क्लिनिक मध्ये बसण्याची संधी दिली गेली.

रुग्णांना मदत करण्याच्या तीव्र इच्छे सोबत त्यांच्या आनंदी आचरणामुळे रुग्णांना स्वतःच्या समस्या व आजार याबद्दल डॉ. मिनीता कडे सुलभतेने सांगता येते.

त्या सकाळी ११ ते १.३० दरम्यान दर मंगळवारी डॉ. बोरकर सेमी चॅरिटेबल दवाखान्यात ही रुग्ण पाहतात.

सहाय्यक डॉक्टर

डॉ. मीनाक्षी बोहरा

दवाखान्यातील सर्वात तरुण डॉक्टर, डॉ. बोरकर आणि जेष्ठ सल्लागार डॉक्टर्सना असिस्ट करतात. डॉ. मीनाक्षी दवाखान्यात नवीन केसेस आणि रुग्णांचे फोन कॉल्स घेतात. त्या इतर डॉक्टर्स प्रमाणेच जास्तीजास्त चांगले शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्या भविष्यात एक चांगली होमीयोपॅथीक डॉक्टर होण्याची खात्री देते.

क्लिनिक स्टाफ

सौ. गौरी चुडनाईक (व्यवस्थापक)

दवाखान्याच्या कामाचा वाढता भार पाहता आम्हला एका व्यवस्थापकाची गरज भासणे साहजिक होते. व्यवस्थापक अशी व्यक्ती हवी जी क्लिनिकच्या कारभाराला व्यवस्थित ओळखते. दवाखान्याशी गेल्या १६ वर्षां पासून संलग्न असलेली व्यक्ती (सौ.गौरी) व्यवस्थापक आहे.

रुग्णांचा कार्यभार पाहणे, व्यवस्थापन, क्लिनिक मधील तांत्रिक गोष्टीं कडे लक्ष देणे या गाष्टी ती काळजीपूर्वक करते, तसेच क्लिनिक मधील इतर कर्मचाऱ्यांसह, असिस्टंट आणि कंसल्टंट डॉक्टर सोबत कामकाजाचा समन्वय साधते.

एक मेहनती व्यक्तीजी स्वतःच्या कामात अतिशय काटेकोर आहे. दवाखान्यामधील समस्या दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते, दवाखान्याचे प्रत्येक कार्य सुव्यवस्थित चालवणे ही तिची मुख्य जबाबदारी आहे.

कु. योगिता चव्हाण

८ वर्षां पेक्षा जास्त काळ डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये कार्यरत असून अगदी लहान वयातच ती दवाखान्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पैकी एक झाली. ती गौरीला तिच्या व्यवस्थापनाच्या कामात बरोबरीने मदत करते.

योगिता सकाळच्या सत्रात रिसेप्शन सांभाळण्या सोबत दवाखान्याची दैनंदिन कामे पाहते, नवीन आणि पुढील भेटीच्या (फॉलॉअप) रुग्णांसाठी वेळा नियुक्ती चे (अपॉइंटमेंट) काम मुख्यतः ती करते, अपॉइंटमेंट संदर्भात तिच्याशी पुढील क्रमांका वर (०२२- २४१७०४१७) सपंर्क साधावा.

ती मेहनती आणि कार्यक्षम असून संवाद साधण्यासाठी सुलभ आहे. सौ. गौरी नंतर हि एक व्यक्ती आहे जी, दवाखान्याच्या कोणत्याही... अगदी औषधे बनवण्यापासून ते अपॉइंटमेंट देण्यापर्यंत सगळ्या कामाची जबाबदारी घेण्यास तत्पर असते.

कु. निकिता सकाटे

निकिताने येथे ५ वर्षे पूर्ण केली असून तिने स्वतःला एक कुशल रिसेप्शनिस्ट म्हणून विकसित केले आहे. योगिताला रुग्णांसाठीच्या अपॉइंटमेंट देण्याच्या कामात ती मदत करते.

तिच्या शांतपणे काम करण्याच्या स्वभावामुळे अँपॉईंटमेंट्स देणे आणि फी संदर्भातील रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देणे या कामाकरिता ती अगदी योग्य ठरते.

जिथे योगिता सकाळी रिसेप्शन सत्र सांभाळते त्याच प्रमाणे संध्याकाळचे सत्र सांभाळण्याची जबाबदारी निकिताची आहे. दवाखान्यातील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी ती गौरी आणि योगिता या दोघीं कडून प्रशिक्षित आहे.

कु. वनिता घोलप आणि कु. मनिषा चव्हाण

जी औषधे घेऊन रुग्णांना बरे वाटते, ती औषधे या दोघीं कडून बनवली जातात म्हणजेच, दवाखान्यात रुग्णांना संजीवनी देण्याचे काम यांच्याकडून केले जाते. तसेच दवाखान्यात औषधे बनवून रुग्णांना ती औषधे कशी घ्याची हे समजावून सांगतात.

५ ते ६ वर्षांपासून ह्या दोघीही डॉ. बोरकर क्लिनिकशी जोडल्या गेल्या आहेत आणि ज्या दवाखान्यात दिवस भर औषधे बनवण्याचे काम अगदी मनापासून कृतज्ञापूर्वक करतात. वनिता सकाळ आणि मनिषा संध्याकाळ च्या सत्रात औषधे तयार करतात.

औषधे कुरिअर करण्याचे काम ही ह्यांच्या कडूनच पाहिले जाते, जे रुग्ण दूर राहतात ते फोन वर संपर्क साधून औषधे कुरिअर द्वारे मागवून घेतात अश्या गरजू रुग्णांना वेळच्यावेळी औषधे पाठवण्याचे तसेच ती त्याच्या पर्यंत पोहचली कि नाही पाहण्याची जबाबदारी सुद्धा ह्या दोघींची आहे.