डॉ. बोरकर

Emergency Cases

09920400132
+91 9920400132

बोरकर क्लिनिक बद्दल थोडेसे ….

होमियोपॅथी ही औषधोपचाराची एक परिपूर्ण शास्त्रोक्त प्रणाली आहे, जी आज वैद्यकीय क्षेत्रात तिची यथायोग्य जागा निर्माण करत आहे. आज  होमियोपॅथीला एक उपचारात्मक यंत्रणा म्हणून पाहिले जात आहे. जी फक्त सर्दी, खोकला आणि त्वचेच्या काही साध्या आजारांवरच उपचार करत नसून असाध्य पॅथालॉजिकल आजार उदा. पक्षाघात, सोरियासिस, गँगरीन, दमा इ. आजारांना हाताळू शकते.

परंतु होमियोपॅथी प्रणालीच्या वाढीची मंदगती, याचा परिणाम म्हणजे अयोग्य सांख्यिकीय डेटा आणि होमियोपॅथीतील बऱ्याच चांगल्या गोष्टी योग्य दस्तवेज न करणे होय.

डॉ. बोरकर क्लिनिकला आम्ही, परिपूर्ण होमियोपॅथीक दवाखाना बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असून, त्यायोगे विविध आजाराने ग्रासलेल्या जगभरातील लोकांना होमियोपॅथीद्वारे योग्य मार्गाने तसेच आमच्या कार्यक्षमतेनुसार बरे करण्याच्या दृष्टिटकोनातून कार्यरत आहोत, आमच्या दवाखान्याला २६ वर्षे पूर्ण झालेली असून आम्ही आजही तेवढ्याच उत्साहात कार्यरत आहोत.

येथे आम्ही विविध प्रकारच्या कठीण आजारांना वैज्ञानिक कुशलतेने आणि आमच्या क्षमतेनुसार हाताळतो. जरी आम्ही सर्व वयोगटातील आणि (बालरोगांपासून-वयस्क, गर्भाशामक) सर्वच लिंगातील तसेच सगळ्याच आजारांवर उपचार करीत असलो तरीही इतरांपेक्षा काही विशिष्ट आजारांमध्ये आमच्या यशाचा दर जास्त चांगला आहे.

आमचा ठाम आणि प्रामाणिक विश्वास आहे कि होमियोपॅथी ही सर्वोत्तम वैद्यकीय प्रणाली आहे आणि

"होमिओपॅथी निरोगी जीवनासाठीची पहिली पसंती असेल"

आमच्या येथे बरे केले/ हाताळले जाणारे आजार

स्त्री रोग

 • अनियमित मासिक पाळी
 • पीसीओसी
 • स्नायू आणि तंतुमय पेशींचे सौम्य ट्यूमर, (फायब्रोइड्स)
 • वांझपणा

पुरुषांचे आजार

 • नपुसंकत्व
 • शीघ्रपतन
 • लैंगीक समस्या

विकासात्मक विकार

 • ऑटिझम
 • ए डी एच डी : एकाग्रता / केंद्रीकरण तूट व
 • अति सक्रियता विकृती

अंतःस्त्रावी विकार

 • थायरॉईड
 • पी सी ओ एस
 • मधुमेह

मेंदू / डोक्यासंबधी (न्यूरोलॉजिकल समस्या)/ मज्जातंतूच विकार

 • फिट, आकडी
 • चेहऱ्याचा / शरीराचा पक्षाघात
 • अर्धशिशी
 • त्रिपुष्ठीय न्युरोलिया (चेहेर्याच्या चेता भागांत वेदना होणे)
 • पार्किन्सन रोग
 • मस्क्युलर डिस्ट्रॉफी
 • मल्टिपल स्क्लेरॉसीस
 • डिस्टोनिया
 • अट्याकझिया : शारीरिक हालचालींवरील नियंत्रण पूर्ण गमावणे
 • स्ट्रोक : मेंदूतील रक्तस्त्राव / रक्तपुरवठा न होणे

जठर व आतड्यांचे आजार

 • भगेंद्र
 • भेग
 • जंत
 • तोंड येणे
 • अल्सरेटिव्ह कोलायटिस : मोठ्या आतड्यांचा आजार
 • हेपेटायटीस – यकृताला आलेली सूज
 • मूळव्याध
 • कावीळ
 • यकृत रोग

श्वसन समस्या

 • ऍलर्जिक नासिकदोष
 • वारंवार होणारा सर्दी, खोकला
 • घशातील सुज (लारिन्जायटिस)
 • दमा
 • ब्रॉंकोयटीस
 • सीओपीडी/li>
 • निमोनिया

त्वचा आणि केसांचे आजार

 • सोरियासिस
 • मस, चामखीळ
 • इसब
 • कुष्ट
 • कोड
 • अलोपेशिया
 • केस गळणे / केस पांढरे होणे
 • पित्त
 • उबाळू / गळू
 • नायटा / गजकर्ण
 • एस टी डी (असुरक्षित यौन संबंधातून होणारा आजार)
 • मुरुम
 • नागीण
 • त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग

मूत्रपिंड / मूत्राशयाचे आजार

 • मुतखडा
 • मूत्रपिंड निकामी होणे

अनुवंशिक / जन्मजात विकृती

 • गुणसूत्र दोषामुळे उद्भवणारी जन्मजात विकृती

या आणि अशा दुर्धर आजारांवर आम्ही उपचार करतो परंतु त्यासाठी ऑनलाईन उपचार न घेता तुम्ही स्वतःहा येऊन उपचार घेण्याला अधिक प्राधान्य दिले जाईल.

DRBORKARCLINIC.COM वेबसाईट

 • मुंबई, भारत आणि जगभरातील दूर वर राहणाऱ्या आजारी व्यक्ती आणि त्यांच्या सहकार्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न म्हणून ही वेबसाईट करण्यात आलेली आहे.
 • या वेबसाईटद्वारे ज्या रुग्णांना शंका, तक्रारी किंवा काही सूचना द्यायच्या आहेत, त्यांना एक मंच उपलब्ध झाला असून डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये संपर्क साधणे अधिक सोपे झाले आहे.
 • आजकाल वेबसाईट किंवा ऑनलाईन असणे हे रुग्ण व दवाखान्याच्या दृष्टीने अत्यावश्यक साधन असून रुग्ण आणि डॉक्टर मधील सुसंवाद सुलभ करण्याचा प्रयत्न करते आणि वेळोवेळी डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार किंवा दिशानिर्देशानुसार अद्यावत (अपडेट) ठेवते.
 • तुमच्या आजाराविषयीच्या किंवा होमिओपॅथीशी संबंधित असलेल्या इतर कोणत्याही शंका / तक्रारी असल्यास तसेच तुम्हाला तुमच्या अनुभवात आम्हाला सहभागी करायचे असल्यास कृपया डॉ. बोरकर क्लिनिक च्या वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला इमेल करा या वेबसाईटद्वारे (मुखपृष्ठ)
 • आम्ही शक्य तितक्या प्रभावीपणे या वेबसाईटच्या दिशेने काम करीत आहोत. तरीही आम्ही हे नक्की स्वीकारू इच्छितो कि, ऑनलाईन केस घेणे डॉक्टर आणि रुग्णा बरोबर संवाद साधणे तेवढेसे प्रभावी नसून कमीतकमी उपचाराच्या सुरुवातीस दवाखान्यामध्ये उपस्थित राहून केस देणे कधीही जास्त फायदेशीर असेल, आणि त्यानंतर पुढील उपचार ऑनलाईन भेटी द्वारे करणे शक्य आहे.
 • वास्तविक रुग्णांना भेटून त्याच्या बद्दल समजून घेणे रुग्णाला डॉक्टर सोबत जोडते, जे नेहमीच कोणत्याही चांगल्या उपचाराच्या मुळाशी असते.
X