परिचय
दवाखान्याच्या कामाचा वाढता भार पाहता आम्हला एका व्यवस्थापकाची गरज भासणे साहजिक होते. व्यवस्थापक अशी व्यक्ती हवी जी क्लिनिकच्या कारभाराला व्यवस्थित ओळखते. दवाखान्याशी गेल्या 20 वर्षां पासून संलग्न असलेली व्यक्ती (सौ.गौरी) व्यवस्थापक आहे. रुग्णांचा कार्यभार पाहणे, व्यवस्थापन, क्लिनिक मधील तांत्रिक गोष्टीं कडे लक्ष देणे या गाष्टी ती काळजीपूर्वक करते, तसेच क्लिनिक मधील इतर कर्मचाऱ्यांसह, असिस्टंट आणि कंसल्टंट डॉक्टर सोबत कामकाजाचा समन्वय साधते. एक मेहनती व्यक्तीजी स्वतःच्या कामात अतिशय काटेकोर आहे. दवाखान्यामधील समस्या दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते, दवाखान्याचे प्रत्येक कार्य सुव्यवस्थित चालवणे ही तिची मुख्य जबाबदारी आहे.