परिचय
डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचे विद्यार्थी, सध्याच्या काळातील एक प्रसिद्ध होमियोपॅथ... गेल्या २६ वर्षांपासून रुग्णांची आपल्या उपचारातून सेवा करीत आहेत. असे चिकित्सक जे जुन्या धाटणीचे असून; मानतात कि केवळ चांगले कार्य आणि रुग्णांकडून होणारी प्रशंसा हा डॉक्टर म्हणून लोकप्रिय आणि यशस्वी होण्याचा मार्ग आहे. ते त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला त्यांच्या कडील सर्वोत्तम उपचार देण्यावर विश्वास ठेवतात. डॉ. बोरकर अविरत, प्रामाणिकपणे आणि सचोटीने गेली २६ वर्षे त्यांच्या रुग्णांवर सर्वोत्तम क्षमतेने उपचार करत आहेत आणि असेच शेवटपर्यंत सुरु ठेवण्याच्या प्रयत्नांत ते राहतील... त्यांना प्रामाणिक पणे असे वाटते कि होमियोपॅथी ही औषधोपचाराची सर्वोत्तम प्रणाली असून इतर कोणत्याही औषधोपचारपेक्षा सोपी, सहज आणि आरोग्यदायी आहे. सांघिकरित्या एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर विश्वास ठेवतात, तसेच ते मानतात की, रुग्णांचे आरोग्य हे इतके महत्वाचे आहे, जे एकट्या - दुकट्याने हाताळण्याचे काम नाही आणि म्हणूनच, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या संघाची निर्मिती केली आहे.
Appointmnet Schedules:
Day | Time | Address |
---|---|---|
|
|
|