
डॉ. बोरकर
होमियोपॅथी क्लिनिक

बरे प्रकरणे

सामान्य माहिती आणि काळजी
कोरोना व्हायरससाठी सूचना



























डॉ. बोरकर क्लिनिक बद्दल
उपचार सुरु करण्यासाठी
उपचार सुरु करण्यासाठी येऊन अथवा फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची! आणि हो तेवढे, फोन करून अपॉइंटमेंट निश्चित करायला विसरू नका हं! फोने नंबर +91 9920400132बंर, जर अपॉइंटमेंटच्या दिवशी येणं जमत नसेल तर?
काळजी करू नका उपलब्ध दिवशी पर्यायी अपॉइंटमेंटची व्यवस्था करतो. जास्तीतजास्त आधी आम्हला कळवा बंर! वरील नंबर वर फोने नक्की करा.वैद्यकीय जगातील सर्वच आधुनिक संशोधनांवर विश्वास ठेवणारी आजारी व्यक्तीस त्याच्या आजारानुरूप योग्य मार्गाने बरी करणारी शास्त्रोक्त प्रणाली… होमियोपॅथी!
“अहो…? होमियोपॅथी औषधे उशिरा काम करतात आणि तात्काळ आजारांवर उपयुक्त नाहीत” हे खरं आहे का?
नाही…. ही चुकीची संकल्पना आहे.
“होमियोपॅथी……हा आरोग्यदायी पर्याय” !
नुसतेच एखाद्या अवयवावर इलाज नाही … इथे आम्ही आजारी व्यक्तीस संपूर्णपणे निरोगी करण्यासाठी प्रयत्नशील असतो.“होमियोपॅथी द्वारे” .कसं?
इथे विशिष्ट आजाराला विशिष्ट औषध नाही. थोडक्यात, इथे व्यक्तीच्या आजारावर त्याच्या व्यक्तिमत्त्वांच्या पैलूंनुसार औषधोपचार केला जातो यासाठी डॉक्टर पेशंटची संपूर्ण माहिती घेतात व पेशन्टनेही पूर्ण माहिती दिल्यावरच योग्य दिशेने उपचार सुरु होतो… आजाराला समूळ नष्ट करून, पेशंटला संपूर्णपणे ‘निरोगी’ ठेवण्यासाठी कार्यरत राहणे म्हणजेच ‘होमियोपॅथी’…
होमियोपॅथी गोड, मजेशीर आणि सुरक्षित

आमची प्रक्रिया
अरे ……. घाबरलात का?
आम्हाला संपूर्ण माहिती घेण्यासाठी तसेच, तुम्हाला स्वतःसाठी हि वेळ देणे गरजेचे आहे. कारण याच दिवशी तुम्ही तुमच्या बद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला देता , हि सगळी माहिती आमच्यासाठी खूपच महत्वाची असते, त्यावरून तुमचा आजार आणि स्वभाव समजून घेणे सोपे होते. आम्ही नुमची हि माहिती गोपनीय ठेवतो.
बाहेरगावी राहता ?
मग कमीत कमी ६-७ तास ! आता चिडला किंवा प्रश्न पडला का .. होय ना ! मग आधी थोडा विचार करा सतत छोट्या-छोट्या कारणासाठी क्लिनिक मध्ये येणे जमेल का ? नाही ना …. मग संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी वेळ द्यावीच लागेल ना.
जुने / नवीन सगळे रिपोर्ट आणि फाईल घरी आहेत का ?
मग सोबत आणायला अजिबात विसरू नका !
तुमच्या बद्दलची अधिक माहिती कोणी देईल का?
हो … मग त्यांना तुमच्या सोबत आणल्यास स्वभाव समजून घेण्यात मदत होईल.
पथ्य पालन विचारायचं आहे ?
औषधां सोबतच पथ्य पालनाच्या सूचना लिखित स्वरूपात कंपाउंडर कडून मिळतील.
ह्या उपचार पद्धतीत निदान महिन्यातून एकदा तरी भेट द्यावीच. (सामान्यतः वारंवार आणि गंभीर आजार आहे अशा पेशंटने)
औषधाकरिता येण्यासाठी वेळ घेतली का?
नाही… मग जास्तीजास्त आधीच अपॉइंटमेंट घ्या, दूरच्या व सिरीयस पेशंट ने ४ आठवडे आधीच अपॉइंटमेंट घ्यावी.
अँपॉईनमेंट न घेताच आलात का ?
तुमची काळजी घेण्यासाठी कन्सलटंट डॉक्टर्स आहेतच.
कन्सलटंट डॉक्टर?
जे व्यावसायिक स्तरावर स्वतःची प्रॅक्टिस यशस्वीरित्या पारपाडत असून डॉ. प्रफुल्ल बोरकर यांच्या सोबत गेली काही वर्षे काम करत आहेत. तसेच डॉक्टरांच्या अनुपस्थितीत दवाखान्यातील कार्यभार पाहतात.
अरेरे! तुमची अँपॉईंट्मेंटची वेळ येऊन गेली का?
थोड थांबा ! नंबर प्रमाणे पेशंट पाठवतच आहोत . तुमचाही नंबर येईल.
हॅलो ! उपचारा संबधी आपले काही प्रश्न व समस्या आहेत का?
ऑसिस्टंट डॉक्टरनं बरोबर बोला ना … 08097661783/ 09324894686
अपॉइंटमेंट हवी आहे??
आमच्या रिसेप्शनिस्ट बरोबर बोला… संपर्कासाठी नं. : 09920400132
औषधे कशी घ्यायची असतात?
औषधाच्या बॉटल्स मधील गोळ्या बॉटलच्या झाकणामध्ये घेऊन तोंडात टाकून चोखाव्यात, तर पावडर सरळ जिभेखाली टाकून हळूहळू गिळावी. औषध सरळ हातावर घेऊ नये. औषध सूर्यप्रकाश, अतिउष्णता, ओलावा, सुगंधी द्रव्य आणि तीव्र वासांपासून दूर ठेवणे फायदेशीर असेल. हे नीट लक्षात ठेवा.
खाण्यापिण्यात पथ्य
खाण्यापिण्यात काही पथ्य आहेत का?
नाही, पण…
कांदा, लसूण, इत्यादी गोष्टी नेहमीच्या वापरात लागतात तेवढी वापरण्यास हरकत नाही.
काळा चहा / कॉफी, हर्बल / ग्रीन टी पिणे, किवां थंडक असलेले पदार्थ खाऊ नयेत. तरीही, पेशंटच्या वैद्यकीय परिस्थिती किंवा आजारानुसार कदाचित काही निर्बंध असल्यास त्याप्रमाणे नवीन केस झाल्यानंतर सूचना देण्यात येतील.
हॅलो, या औषधोपचारा दरम्यान इतर कोणतेही उपचार किंवा थेरपी वैगरे.. घेऊ नयेत?
ऐका, आम्ही सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतो तुम्ही फक्त नीट लक्ष द्या.
होमीयोपॅथिक औषधोपचार जास्तीजास्त लाभदायक होण्यासाठी कोणतेही अन्य उपचार / चिकित्सा करत असल्यास उदाहरणार्थ फिजिओथेरपी, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर, रेखी इत्यादी आणि कोणत्याची प्रकारची लस टोचली असल्यास, तसेच टोचण्यापूर्वी आम्हाला कळलेच पाहिजे.
शरीरावर खाज, रॅशेस किंवा पुरळ आहेत का?
शरीराच्या कोणत्याही भागावर, त्वचेवर खाज, रॅशेस किंवा पुरळ आल्यास कसलेही (ऑलोपॅथिक, होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक) लेप, क्रीम्स, मलम, बाम, ऑईन्मेंट अशी औषध कटाक्षाने टाळावी.
शरीराच्या कोणत्याही भागाला बधिर करणारे पेनकिलर स्प्रे किंवा नाकात / कानात / डोळ्यात टाकावयाचे ड्रॉप्स तसेच माऊथवॉश आणि जेल्स वापरता?
आता इथून पुढे (नवीन केस झाल्यावर ) हे थांबवावेच लागेल, होमिओपॅथिक औषधासोबत वरील गोष्टी वापरणे हितकारक नाहीत. म्हणून टाळणे इष्ट!
तुम्हाला वारंवार पित्त, बद्धकोष्ठता, सर्दी, खोकला आणि पडसे यासारखे आजार होतात?
मग स्वतःच घरगुती, आयुर्वेदिक, ऑलोपॅथिक औषधे तसेच बाहेरून होमियोपॅथिक औषधोपचार घेणे थांबवा. तसेच कॉफ सिरप्स आणि मेंथॉल असलेल्या वस्तू कटाक्षाने टाळाव्यात.
मासिक पाळी पुढे / मागे करायची आहे, त्यासाठी औषधोपचार घेऊ शकते का?
नाही… शक्यतो मासिक पाळी पुढे मागे करण्यासाठी औषधे घेऊ नका.
तुम्ही औषधी / हर्बल साबण, हॅन्डवॉश / सॅनिटायझर्स, शॅम्पु, क्रीम्स, ऍलोवेरा जेल्स (अँटी-डॅन्डरफ / अँटी-हेअरफॉल इ.), निमयुक्त, डिओड्रंट्स व सुवासिक तेल वापरता?
मग…. काळजी घ्या, असली कोणतीही उत्पादने वापरू नका.
सौंदर्यप्रसाधनांची आवशक्यता
सौंदर्यप्रसाधनांची आवशक्यता आहेच का ? सुदंर दिसू इच्छिता? खरोखरच सौंदर्यप्रसाधनांमुळे तुम्ही सुंदर दिसत का? तुमचे आंतरिक आरोग्य आणि सौंदर्यापेक्षा बाह्य सुंदरता जास्त महत्वाची आहे का?
याचा विचार करा…… आणि जर तुम्ही आरोग्याला जास्त महत्व देता तर…
पुढील सगळ्या गोष्टीत टाळा – काजळ, मेहंदी, हेअरकलर, कलप, फेशिअल, ब्लीच, फेसपॅक, मुलतानीमाती, डिओड्रंट्स, डिओड्रंट्स पावडर इत्यादी.
पण जखम मोठी नाही … कोणते अँटिसेप्टिक वापरावे ?
जखम झाल्यास साधारण गरम पाण्याने जखम स्वच्छ धुवावी गरज असल्यास जखमेला पट्टी / ड्रेसिंग मेडिकल मध्ये मिळणाऱ्या कापसाने करावी,
परंतु अँटिसेप्टिक क्रीम्स / लोशन्स वापरणे कटाक्षाने टाळावी. (त्याऐवजी साधे / प्लेन खोबऱ्याचे तेल किंवा औषधी नसलेली साधी पावडर वापरू शकता)

जर तुम्हाला स्वतःला लवकरात लवकर आराम पडावा असे वाटत असेल, तर वरील सर्व सूचनांचे लक्षपूर्वक पालन करावेच लागेल.
आपल्या सूचना आणि तक्रारींचे निश्चितच स्वागत असले आणि त्या सोडविण्याचा आमच्या कडून जास्तीजास्त प्रयन्त केला जाईल. आपल्या सूचना आणि तक्रारीं साठी ड्रॉपबॉक्सचा वापर करावा.
आपल्या हितासाठी ………आपणाकडून संपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे!
आपल्या सर्वांना चांगले आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
आमची टीम
परिणाम











होमिओपॅथी तुम्हाला निरोगी राहण्यास कशी मदत करते
सल्लामसलत
सल्लामसलत ही आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबींवर एकमेकांशी बोलण्याची द्वि-मार्गी प्रक्रिया आहे.

सर्वोच्च गुणवत्ता
उच्च-गुणवत्तेचे आरोग्य जे प्रभावी, सुरक्षित, रुग्ण-केंद्रित, वेळेवर, कार्यक्षम आणि व्यावसायिकांद्वारे वितरित केले जाते.

नेहमी हसतमुख
जेव्हा तुम्ही संघर्ष करत असलेल्या आणि नैराश्यात असलेल्या लोकांसाठी निळे वाटतात तेव्हा हसणे तुमचा मूड वाढवू शकते.

वर्षांचा अनुभव

वैद्यकीय तज्ञ

आनंदी रुग्ण
आमच्या वैद्यकीय सेवा

Gastrointestinal / Anorectal disorder
Anorectal disorders are a group of medical disorders that occur at the junction…